Ambadas Danve | महायुतीची मस्ती उतरली; दानवेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 29 Oct 2026, 06:26 PM

Ambadas Danve | महायुतीची मस्ती उतरली; दानवेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल

MH Times
@mhtimes
मराठवाडा पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या दारुण पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी, "महायुती आणि भाजपमधील आलेली मस्ती आणि जनतेची झालेली फसवणूक या निवडणुकीच्या निकालातून उघडी पडली आहे," असा घणाघात केला आहे. जनता जेव्हा सत्ता उलथवून टाकते, तेव्हा कितीही मोठी फौज किंवा सत्ता पाठीशी असली तरी ती टिकत नाही, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation