Pune, Maharashtra
17 Oct 2026, 10:35 AM
आंदोलनानंतर तुकाराम मुंढेंची एन्ट्री, पण विद्यार्थ्यांची फसवणूकच? नितीन चंदनशिवेंचा महत्त्वाचा संदेश
MH Times
@mhtimes
कवी नितीन चंदनशिवे यांनी एमपीएससी विद्यार्थी आंदोलनावर महत्त्वाचे भाष्य केले. सरकारकडून आश्वासन मिळाल्यावर आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील आंदोलन स्थगित झालेय. मात्र या आंदोलनातून विद्यार्थ्यांना काहीच मिळालं नाही, अशी टीका देखील केली जात आहे. अशातच यावर नितीन चंदनशिवे यांनी आपलं मत परखडपणे मांडले आहे. विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलन करताना पाहून वेदना होतात, असे चंदनशिवे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या दिसत नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र संघर्षासाठी महाराष्ट्र तयार असल्याचा संदेश या आंदोलनामुळे गेला, असेही ते म्हणाले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)