मुख्यमंत्र्यांना लाडू, मोसंबीची भेट, शेतकरी कुटुंबासोबत स्नेहभोजन, बालपांडेंची दिवाळी अविस्मरणीय
Nagpur, Maharashtra 09 Nov 2026, 11:21 AM

मुख्यमंत्र्यांना लाडू, मोसंबीची भेट, शेतकरी कुटुंबासोबत स्नेहभोजन, बालपांडेंची दिवाळी अविस्मरणीय

MH Times
@mhtimes
नागपूरच्या रामभाऊ बालपांडे आणि त्यांच्या कुटुंबासाठी यंदाची ही दिवाळी अविस्मरणीय ठरली. कारण या दिवाळीला बालपांडेंचे पाहुणे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! मुख्यमंत्र्यांनी फक्त बालपांडेंच्या घरी भेटच दिली नाही तर त्यांच्या घरी मुक्काम केला, कुटुंबीयांसोबत गप्पा मारल्या आणि अस्सल गावरान भरीत-भाकरीचा आस्वादही घेतला. इथे आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा घरातील छोट्या सदस्यासोबत चांगलेच रमले होते. या चिमुकल्यासोबतही त्यांनी काही क्षण आनंदात घालवले. यामुळे बालपांडेंची ही दिवाळी जरा जास्तच खास ठरली. एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांना निरोप देताना त्यांच्यासाठी घरी तयार केलेले लाडू, शंकरपाळे आणि मोसंबीची शिदोरीही भेट म्हणून देण्यात आली. हा क्षण बालपांडे कुटुंबियांसाठी विशेष ठरला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4

Comments (0)

Login to join the conversation