म्हसावद रेल्वे उड्डाणपुलासाठी ₹45
Paldhi, Maharashtra 08 Oct 2026, 11:02 PM

म्हसावद रेल्वे उड्डाणपुलासाठी ₹45

Kiran Mali
@reporter_kiran
म्हसावद रेल्वे उड्डाणपुलासाठी ₹45.82 कोटींची सुधारित मंजुरी
जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या सुधारित अंदाजपत्रकाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मूळ ₹25 कोटींच्या मंजुरीत ₹20.82 कोटींची वाढ करण्यात आली असून, आता प्रकल्पाची किंमत ₹45.82 कोटी झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जारी झाला. सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामाला आता गती मिळणार आहे. #jalgaon #politics
4

Comments (0)

Comments are disabled for this post.