Pune, Maharashtra
27 Nov 2026, 06:06 PM
सुनेत्रा काकींची माफी, पण दादांची जागा कुणी घेऊ शकत नाही; रोहित पवारांचा राष्ट्रवादीवर पलटवार
MH Times
@mhtimes
पुण्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. त्यातच आमदार रोहित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्र्यांना अजितदादांसारखं काम करता येत नाही असं वक्तव्य केल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आणि रोहित पवारांविरोधात आंदोलनं करण्यात आली. मात्र या प्रकरणी रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच राष्ट्रवादीलाही जोरदार चपराक लगावली. रुग्णालयात दाखल असलेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी रोहित पवार मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
11
Comments (0)