काँग्रेसचा पंजा भाजपवर भारी, अखेर कराळे फॅक्टर निर्णायक ठरला, वंजारींना खांद्यावर घेत जल्लोष
Nagpur, Maharashtra 29 Oct 2026, 11:26 AM

काँग्रेसचा पंजा भाजपवर भारी, अखेर कराळे फॅक्टर निर्णायक ठरला, वंजारींना खांद्यावर घेत जल्लोष

MH Times
@mhtimes
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. भाजपचे सुधाकर कोहळे आणि अभिजित वंजारी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोहळे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत निकालाचे चित्र बदलले. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांनी शेवटच्या क्षणी गणित बदलले. तर ‘जो जीता वो सिकंदर’ आणि मी जिंकलेलो आहे. अशा शब्दांत वंजारी यांनी आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation