Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
27 Oct 2026, 12:55 PM
Marathwada Graduate Constituency Election Result | पदवीधर निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया कशी असते?
MH Times
@mhtimes
औरंगाबाद (मराठवाडा) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी ठीक ८ वाजता चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे प्रारंभ झाला आहे.सकाळी 7.25 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चावरे आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात आली. त्यानंतर मतमोजणी कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली.आठ जिल्ह्यांतील 842 मतदान केंद्रांवरील मतपेट्यांची मोजणी 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पडत आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)