Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
26 Oct 2026, 02:06 PM
500 कोटींच्या आरोपानंतर शिंदेंच्या शिवसेनेत फूट पडली? वादावर शिरसाट बोलले
MH Times
@mhtimes
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मांडलेल्या भूमिकेवरून पक्षात अंतर्गत मतभेद असल्याच्या उठणाऱ्या चर्चांना मंत्री संजय शिरसाट यांनी पूर्णविराम दिला आहे. रामदास कदम हे शिवसेनेचे अत्यंत वरिष्ठ आणि खंदे नेते असून त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांकडे पक्षनेतृत्वाने अत्यंत गांभीर्याने पाहिले आहे. रामदास कदम यांच्या पाठीशी कोणी नाही असे समजण्याचे कोणतेही कारण नसून, संपूर्ण पक्ष आणि नेतृत्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या विषयावर पक्षात कसलेही मतभेद किंवा अंतर्गत फूट नाही, असे स्पष्टीकरण मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांची संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)