Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
17 Oct 2026, 04:36 PM
सतीश चव्हाणांना पाठिंबा, शिरसाटांची मोठी घोषणा, मराठवाड्यातील वादावर अखेर पडदा!
MH Times
@mhtimes
अमरावतीच्या जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला दुरावा आणि मंत्री संजय शिरसाट यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अखेर संपुष्टात आली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी स्वतः मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान सतीश चव्हाण यांना शिरसाट यांच्या घरी सुमारे १५ मिनिटे 'वेटिंग'वर राहावे लागले होते. अखेर या यशस्वी बैठकीनंतर शिरसाट यांनी मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांना महायुतीकडून पाठिंबा जाहीर केला असून युतीमधील सर्व बेबनाव मिटल्याचे स्पष्ट केले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)