Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
14 Oct 2026, 11:06 AM
सत्ताधारी मंत्र्यांनाही विवेकानंदच्या भाषणाची भुरळ; उदय सामंतांकडून कौतुक, रोहित पवारांना टोमणा
MH Times
@mhtimes
दमदार आणि विनोदी भाषणानं महाराष्ट्राला वेड लावणारा तरुण विवेकानंद पाटील याचे आता असंख्य फॅन्स बनले आहेत. एमपीएससी आंदोलनात तर अनेक राजकीय नेतेही विवेकानंदचं वक्तृत्व पाहून भारावून जात होते. पण त्याच्या या फॅन्सच्या यादीत केवळ विरोधी पक्षातील नेतेच नाहीत तर सत्ताधारी मंत्र्यांचाही समावेश आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी तर भर मंचावरून विवेकानंदवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)