Paldhi, Maharashtra
12 Oct 2026, 08:57 PM
पथराड येथे २.३० कोटींच्या वीज उपकेंद्राचे लोकार्पण संपन्न
Kiran Mali
@reporter_kiran
पथराड येथे २.३० कोटींच्या वीज उपकेंद्राचे लोकार्पण
धरणगाव तालुक्यातील पथराड येथे २ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या उपकेंद्रामुळे परिसरातील चार ते पाच गावांना दिवसा वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. यावेळी शेतरस्ते, नाला खोलीकरण, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि रोजगारनिर्मितीसाठी चॉकलेट कारखाना व सूतगिरणी उभारण्याच्या नियोजनाची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. #

7
Comments (0)