Kolhapur, Maharashtra
25 Nov 2026, 09:55 PM
मराठमोळा साज करून बॉलीवूड गर्ल श्रद्धा कपूर कोल्हापुरात! 'ईठा'चा ठसका पाहाच
MH Times
@mhtimes
कोल्हापूरच्या मातीत बालपणीच्या असंख्य आठवणी .. आणि याच आठवणींच्या ओढीने आणि मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान जपत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा कोल्हापुरात आली. आपल्या मराठमोळ्या अंदाजामुळे श्रद्धा नेहमीच चर्चेत असते. आताही तिच्या आगामी 'ईठा' चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या श्रद्धाने सर्वप्रथम करवीर निवासिनी अंबाबाईचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी श्रद्धाचा अस्सल पारंपरिक मराठमोळा लूक पाहून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे, कोल्हापूरशी असलेलं आपलं नातं जपत श्रद्धाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. सध्या तिच्या या कोल्हापूर भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे!
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)