Solapur | ऊसाला भाव मिळाल्याशिवाय हटणार नाही, शेतकऱ्यांचा आक्रोश
Solapur, Maharashtra 16 Nov 2026, 06:41 PM

Solapur | ऊसाला भाव मिळाल्याशिवाय हटणार नाही, शेतकऱ्यांचा आक्रोश

MH Times
@mhtimes
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा दाखल झाला आहे. हजारो शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच शेतकरी संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ऊसाला प्रति टन 3500 ते 4000 हजार भाव मिळावा यासाठी बळीराजा आक्रमक झाला आहे. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितलं, आम्ही सडून मरण्यापेक्षा लढून मरण्याचा निर्णय घेतला आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यात साखर कारखानदार 4 हजार भाव देतात, मात्र सोलापूर जिल्ह्यात आजही 2500 किंवा 2800 रुपये प्रति टन इतका भाव मिळतो. जो पर्यंत 3500 ते 4000 हजार भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी सोडणार नाही अशी ठाम भूमिका मांडली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
13

Comments (0)

Login to join the conversation