Kolhapur, Maharashtra
10 Nov 2026, 08:16 PM
पिवळी टोपी, काळा गॉगल, Chandrakant Patil यांची सतेज पाटलांना इशारा, 'जागा दाखवणार'
MH Times
@mhtimes
महाविकास आघाडीच्या संघर्ष मोर्चानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात वातावरण तापवलं. यावेळी त्यांनी सतेज पाटलांवर जोरदार टीका केलीय.. आणीबाणीच्या आठवणी सांगत काँग्रेस आणि बंटी पाटलांवर बोचरी टीका केली. आणीबाणी आणली तुम्ही, 20 लाख लोकांना तुरुंगात टाकलं तुम्ही. बोलायचं नाही अटक, लिहायचं नाही अटक, मोर्चा काढला अटक... 19 महिने लोक तुरुंगात होते. माझी आधीची बायको विद्या ठाकूर, तेव्हा 8 वीमध्ये होती. वडिल तुरुंगात, आई जेलमध्ये, भाऊ जेलमध्ये, बहिण जेलमध्ये, एकाच घरातील 4 माणसं जेलमध्ये होती. माझी बायको, 8 वीच मुलगी तेव्हा जे जे आंदोलनात तुरुंगात गेले होते, त्यांच्या घरी डबा पोहोचवायची असं चंद्रकांत पाटील म्हणाले
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)